BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : गैरसमजातून भांडण पेटले; दोघांनी मिळून तरुणाला बदडले

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दोन तरुण एकमेकांशी बोलत उभे असताना तिस-या तरुणाला ते भांडण करत असल्याचा भास झाला. त्यामुळे तिस-याने येऊन एकाला चापट मारली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या चौथ्या तरुणाला दोघांनी मिळून बदडले. ही घटना सोमवारी (दि. 15) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास रमाकांत नगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

सिद्धांत सूर्यकांत गरुड (वय 20, रा. रमाकांत नगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर जिजाबा गायकवाड, सोनू जिजाबा गायकवाड (दोघे रा. रमाकांत नगर, तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सिद्धांत आणि सागर सोमवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास रमाकांत नगर येथील बौद्ध विहारासमोर बोलत थांबले होते. त्यावेळी त्यांच्यापासून काही अंतरावर सागरचा भाऊ सोनू थांबला होता. सिद्धांत आणि सागर एकमेकांशी भांडत असल्याचा गैरसमज सोनू याला झाला. त्यावरून सोनू याने सिद्धांत याला चापट मारली आणि त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला.

हे भांडण सोडविण्यासाठी सिद्धांत याचा मित्र सिद्धार्थ आला. सिद्धार्थ भांडणामध्ये आल्याचा राग आल्याने सागर आणि सोनू या दोघांनी मिळून सिद्धार्थ याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने देखील मारले. यामध्ये सिद्धार्थ जखमी झाला. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.