Talegaon : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कंटेनर पलटला

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे मुंबई महामार्गावर एक कंटेनर पलटी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) पहाटे सोमाटणे फाटा (Talegaon) येथे घडली.

Pune : मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत ऑगस्ट महिन्यात फुकट्यांकडून सुमारे दीड कोटींचा दंड वसूल

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर (एमएच 12/युएम 2683) प्लास्टिकचा कच्चा माल घेऊन जात होता. सोमाटणे फाटा येथे कंटेनरला अपघात झाल्याने कंटेनर पलटी झाला. या अपघातात कंटेनर काही अंतरापर्यंत घसरत गेला. त्यामुळे कंटेनर मधील प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या गोण्या रस्त्यावर पडल्या.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावर कंटेनर पलटी झाल्याने काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या काही अंतरापर्यंत रांगा लागल्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.