Talegaon : कोरोना इफेक्ट; कुंडमळा पर्यटकांसाठी 30 जुलैपर्यंत बंद

Corona effect; Kundmala closed for tourists till July 30 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंडमळा येथे पर्यटकांची गर्दी होण्याचा धोका आहे

एमपीसीन्यूज : कोरोनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मावळातील प्रसिद्ध  31  स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा आदेश प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिला. परंतू, यात इंदोरीजवळील कुंडमळा स्थळाचा समावेश नसल्याने पर्यटक कुंडमळ्याकडे मोठी गर्दी करण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून स्थानिक ग्रामस्थ व कुंडदेवी मित्र मंडळाने 30 जुलै पर्यंत कुंडमळा स्थळ पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच विनाकारण कुंडमळ्यावर येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कुंडदेवी मित्र मंडळाने दिला आहे.

इंदोरी जवळील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीच्या बंधाऱ्यावरुन आदळणारे पाणी, वर्षभर काठोकाठ भरलेले इंद्रायणी पात्र, वनराईने नटलेला परिसर, पात्रात खाली पसरलेल्या खडकात निर्माण झालेले विवर, खोल खोल घळया, विविध आकाराचे नैसर्गिक रांजण खळगे, तसे इंद्रायणी पात्रातील नयनमनोहर कुंडदेवीचे मंदिर यामुळे पर्यटक वर्षभर इथे गर्दी करतो.

मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मावळातील प्रसिद्ध 31 स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रांताधिकऱ्यानी घेतला.

त्यामुळे पर्यटक कुंडमळा इथे मोठी गर्दी करणार आणि ही बाब कोरोना प्रादुर्भावाचे द्दष्टीने घातक ठरणार आहे. हा धोका ओळखूनच स्थानिक पातळीवर पर्यटक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.