Talegaon Corona News : वास्तु डेव्हलपर्स आणि डॉ. कुदळे यांच्या तर्फे तळेगावात ‘आधार’ कोविड हॉस्पिटल

एमपीसी न्यूज – वास्तु डेव्हलपर्स आणि डॉ. महेश कुदळे यांच्या वतीने तळेगाव शहरात ‘आधार’ कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळेगावातील नागरिकांची सुविधा व्हावी या उद्देशाने याची सुरुवात करण्यात आली आहे.

तळेगाव रेल्वे स्टेशन येथील प्रताप मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणी ‘आधार हॉस्पिटल मल्टीस्पेशालीटी अँड आयसीयु’ सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.06) साध्या पद्धतीने हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्यावेळी डॉ. राजेश फडतरे उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

आधार हॉस्पिटलमध्ये एकूण 40 बेडस् आहेत. त्यापैकी 18 ऑक्सिजन बेडस्, 14 जनरल बेडस् असून 8 आयसीयु व 2 व्हेन्टिलेटर सुसज्ज बेडस् आहेत.

डॉ. महेश कुदळे चार हॉस्पिटलचे संचालक आहेत. यामध्ये ओझेस हॉस्पिटल- रावेत, जीवन रेखा- देहूरोड, आधार हॉस्पिटल- देहूरोड व आयुष्य हॉस्पिटल- पिंपरी यांचा समावेश आहे. शुक्रवारपासून (दि.07) तळेगावात ‘आधार’ कोविड हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल झाले असून, तळेगावकरांना याचा फायदा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.