Talegaon : कचरावेचकाला मारहाण करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कचरा उचलण्याचे काम करणा-या कचरा वेचकाला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करणा-या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 31) दुपारी एकच्या सुमारास तळेगाव चाकण रोडच्या बाजूला असलेल्या भाजी मंडई जवळ घडली.

फारुख (पूर्ण नाव माहिती नाही, वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष शंकर जाधव (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष कचरा उचलण्याचे काम करतात. ते शनिवारी दुपारी एकच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवर असलेल्या भाजी मंडईतील कचरा उचलत होते. त्यावेळी आरोपी फारूख याने विनाकारण लाकडी काठीने संतोष यांच्या डोक्यात मारले. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले. त्यानंतर फारूख याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.