Talegaon Crime : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये घुसून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करणा-याला अटक करून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 17) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांना धक्काबुक्की झाली असून त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रुपेश ज्ञानेश्वर वाघुले (वय 28, रा. दारुंब्रे, ता. मावळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश याच्यावर दंगल आणि अन्य असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका दंगलीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार हे करीत आहेत. त्या गुन्ह्यात आरोपीचे वाहन जप्त करायचे होते. मात्र, तो टाळाटाळ करीत होता.

पोलिसांनी तपासासाठी बोलावून देखील तो हजर राहत नव्हता. गुरुवारी सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास आरोपी रुपेश अचानक तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक पवार आपल्या केबिनमध्ये होते. आरोपी रुपेश थेट पवार यांच्या केबिनमध्ये घुसला आणि त्याने पवार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

आरोपी रुपेश याने पोलीस निरीक्षक पवार यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. यावरून त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी रुपेश याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात देखील हजर करण्यात आले असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी रुपेश याची रवानगी थेट येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'86b83cd75d870854',t:'MTcxMTYzNTM4NS4wMTAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();