Talegaon Crime News : जुन्या भांडणातून परस्पर विरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटीमध्ये झालेल्या जुन्या भांडणातून पुन्हा एकदा परस्पर विरोधी गुन्हे तळेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात (Talegaon Crime News ) आले आहेत.यामध्ये काही जण आधीपासूनच जामीनावर सुटले आहेत तर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पहिल्या तक्रारीत महिलेला अपमास्पद बोलल्या प्रकऱणी दोन महिला व अफसान ताजफिर शेख (वय 19 रा.यशवंतनगर,तळेगाव) याना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी 15 जानेवारी रोजी फिर्यादी महिलेशी अपमानास्पद बोलून त्यांचा अपमान केला होता. याप्रकरणी मंगळवारी (दि.31) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

PCMC : मालमत्ता कर थकबाकी नसल्याची ‘एनओसी’ मिळणार ऑनलाइन

तर दुसऱ्या तक्रारीत महिलेने फिर्याद दिली असून त्याच सोसायटीचे सेक्रेटरी मोरे, त्यांची पत्नी, सतीश कदम, त्यांची पत्नी, इतर अनोळखी इसम व महिला यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

दुसऱ्या तक्रारीतील आरोपी हे जामिनावर असून त्यांच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी फिर्यादी महिलेला ढकलून देत कानाखाली मारली. तसेच गैरवर्तन करत (Talegaon Crime News ) जखमी केले. दोन्ही तक्रारी दाखल केल्या असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.