-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon Crime News : पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – घरगुती किरकोळ कारणांवरून मारहाण करून विवाहितेचा छळ केला. तसेच बळजबरीने अनैसर्गिक कृत्य करून तिच्यावर अत्याचार केला. तळेगाव दाभाडे येथे 25 मे ते 22 जून 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पीडित महिलेने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाला आहे, असे पीडित फिर्यादी महिलेला सांगितले. आळंदी येथे नेऊन आरोपीने फिर्यादी सोबत लग्न केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीचा छळ सुरू केला. फिर्यादीला स्वयंपाक येत नाही. घरात कचरा असतो तसेच पगाराचे पैसे देत नाही, अशा घरगुती किरकोळ कारणावरून आरोपीने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपीने फिर्यादीवर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.