Talegaon crime News : कुत्र्यावरून दोन कुटुंबात कडाक्याचे भांडण; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – कुत्र्यावरून दोन कुटुंबांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. याबाबत दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधात गुन्हेही दाखल केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता साईनगर, गहुंजे येथे घडला आहे.

ओंकार शिवशंकर सिंग (वय 59, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, गहुंजे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रवींद्र पोटफोडे, रवींद्र यांची पत्नी (पूर्ण नाव माहिती नाही), रोहन पोटफोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार सिंग यांच्या फिर्यादीनुसार, ओंकार यांची सून रोमा सिंग मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांच्या घरासमोर कुत्र्याला बिस्कीट टाकत होती. त्यावेळी आरोपी रवींद्र यांच्या पत्नीने ‘रोड काय तुझ्या बापाचा आहे का’ असे म्हणून शिवीगाळ केली.

फिर्यादी यांचा मुलगा काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आला असता आरोपींनी त्याला हाताने मारहाण केली. फिर्यादी यांनाही लोखंडी रॉडने मारून जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात रवींद्र पुरुषोत्तम पोटफोडे (वय 55, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, गहुंजे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार सिंग, अमितकुमार सिंग, रोता सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटफोडे यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री आरोपींचे कुत्रे फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून आले. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलीला हॉकी स्टिक, लोखंडी पट्टी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.

दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.