Talegaon crime News : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

हा प्रकार मागील सहा महिन्यांपूर्वी नवलाख उंबरे येथे जाधववाडी धरणाजवळ घडला.

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला बाहेर फिरायला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपूर्वी नवलाख उंबरे येथे जाधववाडी धरणाजवळ घडला.

याबाबत गुरुवारी (दि. 20) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजेंद्र ढसाळ (वय 21, रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर मागील सहा महिन्यांपूर्वी दोघेजण आरोपीच्या स्कूटरवर बसून नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर फिरायला गेले.

धरणाजवळ असलेल्या बंद खोलीत शुभम याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.