Talegaon crime News: पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कारमध्ये बसवून महिलेशी गैरवर्तन

ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली असून याबाबत 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लिंब फाट्यावर दोन व्यक्तींनी एका महिलेला कारमध्ये बसवून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली असून याबाबत 2 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14 / ईयु 7245 या कारमधील दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या कारमध्ये बसवले.

लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या अंगावरील कपडे फाडून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.