Talegaon Crime News : फोन व मेसेज करुन महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – फोन व मेसेज करुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोव्हेंबर 2020 ते 28 मे 2021 या कालावधीत पवनानगर, मावळ याठिकाणी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

शुभम संभाजी सपकाळ (वय 22, रा. आढले, मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं शनिवारी (दि.29) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने फिर्यादी महिलेला वारंवार फोन व मेसेज करुन मानसिक त्रास दिला तसेच, विनयभंग केला. दाखल फिर्यादीवरून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.