Talegaon Crime News : मोक्काच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला अटक; गुंडा विरोधी पथकाची नवी मुंबईत कारवाई

एमपीसी न्यूज – मोक्काच्या (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) गुन्ह्यातील सराईत आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने नवी मुंबई येथून अटक केली.

तेजस प्रकाश साळवे (वय 27, रा. यशवंतनगर, वेदचक्र चौक, तळेगाव रेल्वे स्टेशन जवळ, तळेगाव दाभाडे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजस विरोधात फसवणूक, विनयभंग आणि गंभीर स्वरूपाची दुखापत करणे, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर 2018 मधील एका गुन्ह्यात मोक्‍का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

मात्र, याची कुणकूण लागताच तो पळून गेला. सध्या तो नवी मुंबईतील उलवे गाव येथे असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्या 3 मे रोजी अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरीश माने, कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, शुभम कदम यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.