Talegaon Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; 12 लाख 30 हजारांचा प्रतिबंधित गुटखा पकडला

एमपीसी न्यूज – मुंबईहून हडपसर येथे प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 30) पोलिसांनी कारवाई करून एक पिकअप ताब्यात घेतले. त्यातून 12 लाख 30 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

करम होशियतअली शेख (वय 29, रा. कामन रोड, भिवंडी, ठाणे) आणि त्याचा एक साथीदार अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून हडपसर येथे एका पिकअपमधून प्रतिबंधित गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा सबवे जवळ सापळा लावून पिकअप (एम एच 47 / ए एस 1481) ताब्यात घेतले.

पिकअपची झडती घेतली असता त्यात 12 लाख 30 हजार 560 रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि पिकअप असा एकूण 20 लाख 54 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.