Talegaon Crime News : सोसायटीसमोर खेळणाऱ्या नऊ वर्षीय मुलाला कारची धडक; पाय मोडला

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगजवळ मोकळ्या जागेत खेळत असलेल्या एका नऊ वर्षीय मुलाला कारने धडक दिली. यात मुलाचा पाय मोडला. ही घटना सहा मार्च रोजी सकाळी चौराईनगर, सोमाटणे येथील सिल्वाई सोसायटीमध्ये घडली.

_MPC_DIR_MPU_II

सार्थक फुलाजी गायकवाड (वय 9) असे जखमी मुलाचे नाव आहे. याबाबत फुलाजी जयवंता गायकवाड (वय 35, रा. चौराईनगर, सोमाटणे) यांनी सोमवारी (दि. 17) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक गौरव वहिले (रा. सोमाटणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सार्थक त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगजवळ असलेल्या मोकळ्या जागेत इतर मुलांसोबत खेळत होता. त्यावेळी आरोपी गौरव त्याची कार (एम एच 14 / डी एफ 5958) घेऊन भरधाव वेगात जात होता. गौरव याने निष्काळजीपणाने कार चालवून सार्थकला जोरात धडक दिली. यामध्ये सार्थकचा उजवा पाय मोडून गंभीर दुखापत झाली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.