Talegaon Crime News : महिलेचा विनयभंग करणाऱ्या ठेकेदाराला अटक

एमपीसी न्यूज – ठेकेदाराने महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑगस्ट 2020 ते 30 मे 2021 या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ठेकेदाराला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

रंगराव सायन्ना गुंडलवार (वय 43, साईकॉलनी साळुंब्रे, ता. मावळ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं सोमवारी (दि.31) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरासमोर काम करत असताना आरोपी ने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. फिर्यादी महिला शिरगाव पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांना अश्लील हावभाव केले व ‘माझ्यासोबत फिरायला आली नाहीस तर जीवे मारुन टाकीन’ अशी धमकी दिली. दाखल फिर्यादीवरून आरोपीला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.