Talegaon Crime News : रस्त्यावर गाड्या वळवण्यावरून वाद; चौघांकडून एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यावर गाड्या वळवण्यावरून वाद झाला. यामध्ये चार जणांनी मिळून एकाला शिवीगाळ करत हाताने व फरशीने मारून जखमी केले. त्यानंतर जखमी व्यक्तीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली.

धीरज भारत आगळे (वय 33, रा. रमाकांतनगर, तळेगाव दाभाडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल ठाकूर (रा. तळेगाव दाभाडे) आणि त्याचे तीन मित्र (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज आणि आरोपी कुणाल यांच्यामध्ये रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास रस्त्यावर गाड्या वळवण्यावरून वाद झाला. त्या कारणावरून कुणाल आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांना फरशीने डोक्यात मारून जखमी केले. आरोपी कुणालच्या तीन साथीदार मित्रांनी फिर्यादी यांना काठीने मारहाण केली. तसेच कुणाल याने फिर्यादी यांना ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.