Talegaon Crime News : जुन्या भांडणाच्या रागातून हाणामारी, परस्परविरोधी गुन्हा 

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून झालेल्या मारहाणीत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदोरी, चाकण-तळेगाव रोडवर शुक्रवारी (दि.10) हा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रशांत चंद्रकांत गायकवाड (वय 24, रा. वरची शिंदे वस्ती, नाणोली, ता मावळ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून, प्रतिक विलास जगताप, संकेत रामचंद्र जगताप, अनिकेत विणू जगताप, विलास दत्तात्रय जगताप (सर्व रा. नाणोली, ता. मावळ, जि. पुणे), गणेश जंबुकर (रा. सुदवडी) आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, प्रतिक विलास जगताप (वय 19, रा. नाणोली, ता. मावळ, जि. पुणे) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून, प्रशांत चंद्रकांत गायकवाड, स्वप्निल चंद्रकांत गायकवाड, सुनिल आनंदा काळे, सुधीर बाळू चिंचवडे, प्रथमे दत्ता गायकवाड, सुनिल चंद्रकांत गायकवाड, चंद्रकांत राम गायकवाड (सर्व रा. नाणोली ता. मावळ, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण करण्यासाठी आलेल्या दोन्ही फिर्यादी यांच्यात जुन्या भांडणाच्या रागातून मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.