Talegaon Crime News : भाडेतत्वावर नेलेली गाडी परत न देता फसवणूक

एमपीसी न्यूज – भाडे देतो, असे सांगून चारचाकी गाडी घेऊन जाऊन गाडी व गाडीचे भाडे न देता फसवणूक केली. ही घटना मावळ तालुक्यातील मौजे बधलवाडी गावच्या हद्दीत 6 सप्टेंबरला सायंकाळी घडली.

याप्रकरणी श्रीहिदास हरिशचंद्र बधाले (वय 43, रा. दहातोंडे वस्ती, बधलवाडी, पो. नवलाखउंब्रे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र किसन लोहार (वय 34, रा. शिरगाव, सोमाटणे फाटा, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चारचाकी वाहन आरोपीने अ‍ॅग्रीमेंट करून भाडेतत्वावर घेतले. त्यात दरमहा 30 हजार रुपये फिर्यादी यांना देण्याचे ठरले होते. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीची गाडी त्यांच्या ताब्यातून घेऊन जाऊन गाडी व गाडीचे भाडे न देता फिर्यादीची फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.