Talegaon Crime News : जेसीबीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अचानक रस्त्यात जेसीबी घेऊन आलेल्या जेसीबीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी जेसीबी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात रविवारी (दि. 26) सकाळी साडेअकराच्या सुमारास चांदखेड फाटा, कोराळे फाटा येथे घडला.

अजित साठे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. युसुफ शेख (वय 30, रा. चांदखेड) असे आरोपीचे नाव आहे. सचिन भागुजी साठे (वय 32, रा. ओव्हळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ अजित साठे हा त्याची दुचाकी घेऊन हिंजवडी येथे जात होता. त्यावेळी जामखेड फाटा येथे आरोपी युसुफ शेख हा जेसीबी घेऊन अचानक समोर आला. त्यामुळे अपघात होऊन त्यात अजित साठे गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान अजित साठे यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.