Talegaon Crime News : डॉक्टरच्या घरातून दागिने चोरीला; घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय

एमपीसी न्यूज – डॉक्टर महिलेच्या घरातून 60 हजार 500 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला जाण्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. या प्रकरणी
घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केला जात असून ही घटना सात सप्टेंबर रोजी मायमर मेडिकल कॉलेजच्या टिचिंग स्टाफ क्वार्टर येथे घडली.  

भाग्यश्री ज्ञानेश्वर माळी (वय 36, रा. वराळे फाटा, ता. मावळ) असे संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. याबाबत डॉ. सोनाली श्रीनिवास देशमुख (वय 36) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी फिर्यादी यांच्या घरी घरकाम करते. फिर्यादी यांनी सोन्याची धातूची चेन, चौकोनी चांदीचे लॉकेट लावलेले 60 हजार 500 रुपये किमतीचे दागिने बेडरूम मधील फ्रीजवर ठेवले होते. ते दागिने चोरीला गेले. हा प्रकार 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीत घडला. फिर्यादी यांच्या घरी घरकाम करणाऱ्या भाग्यश्री माळी या महिलेवर फिर्यादीचा संशय असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.