Talegaon Crime News : पैशांसाठी विवाहितेचा छळ; पती, सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज – अनेक महिलांबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाबाबत विवाहितेने पतीला जाब विचारल्यामुळे पतीने मारहाण करत आईकडून पैसे घेऊन ये, नाहीतर नांदवणार नाही, असे म्हणत विवाहितेचा छळ केला. हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे घडला.

याप्रकरणी गणेश फुलचंद परदेशी (वय26), सासू पुष्पा फुलचंद परदेशी (वय 65, दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहितेने फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातून हा गुन्हा भोसरी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश याचे अनेक महिलांबरोबर अनैतिक संबंध होते. याचा जाब फिर्यादी यांनी पतीला विचारला असता शिवीगाळ करत मारहाण केली. तुझ्या आईकडून पैसे घेऊन ये नाही  तर तुला नांदवणार नाही, अशी धमकी देत मानसिक आणि शारिरीक त्रास दिला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.