Talegaon Crime News : साउंड सिस्टीमचा आवाज कमी करण्यास सांगितल्यावरुन सख्ख्या भावावर सुरीने वार

एमपीसी न्यूज – घरातील साउंड सिस्टीमचा आवाज बंद करण्यास सांगितल्यावरुन सख्ख्या भावानेच आपल्या भावावर सुरीने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता मावळ तालुक्यातील कोटेश्वरवाडी येथे घडली.

पोपट सोपान दाभाडे (वय 40, रा. कोटेश्वरवाडी, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत संजय सोपान दाभाडे (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोपट आणि फिर्यादी संजय हे सख्खे भाऊ आहेत. पोपट याने त्याच्या घरातील साउंड सिस्टीमचा आवाज मोठा केला. त्यामुळे फिर्यादी संजय यांनी आवाज कमी करण्यास सांगितले. त्यावरून पोपट याने संजय यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सुरीने संजय यांच्या मानेवर व डोक्यावर मारुन जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.