Talegaon Crime news : शिरगाव येथे दोन दारू भट्ट्यांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – शिरगाव पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बाजूला सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर छापा मारून तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दुस-या दारूभट्टीवर छापा मारून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

पहिल्या याप्रकरणात मर्जिना हेमराज रजपूत (वय 45), राहुल जीवन मन्नावत (वय 35, रा. शिरगाव, कंजारभाटवस्ती, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगाव परिसरातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बाजूला एका शेतात आरोपींनी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी लावली होती. पोलिसांनी त्यावर छापा मारून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचे साहित्य हस्तगत केले.

दुस-या प्रकरणात पारुबाई ईश्वर राजपूत (वय 45), रुपेश ईश्वर राजपूत (वय 45), राहुल जीवन मन्नावत (वय 35, सर्व रा. शिरगाव,कंजारभाट वस्ती, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी शिरगाव गावात पवना नदीच्या काठावर मोकळ्या जागेत दारूभट्टी लावली होती. त्यावर कारवाई करत शिरगाव पोलिसांनी दोन लाख तीन हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिघी पोलिसांनी जावेद जमशेद अन्सारी (वय 19, रा. वडमुखवाडी, च-होली) याच्यावर बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्याच्याकडून एक हजार 976 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी तेजस देविदास डहाणे (वय 19, रा. चिखली) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 18 हजार 212 रुपये किमतीची देशी, विदेशी दारू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी तेजस हा बेकायदेशीरपणे दारू विक्री करत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.