Talegaon Crime News : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – शाळेत शिकत असताना ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि लग्नाचे अमिष दाखवून तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी 11 आठवड्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

आकाश अशोक कदम (वय 19, रा. घोरावाडी स्टेशन, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी सन 2019 मध्ये दहावीच्या वर्गात शिकत असताना तिची आरोपी सोबत ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपी आकाश याने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून तिच्यावर 28 आणि 29 नोव्हेंबर 2020 रोजी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलगी 11 आठवडे 6 दिवसांची गरोदर राहिल्यावर उघडकीस आला. पोलिसांनी आकाशला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.