Talegaon Crime News : वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यात ती मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

विनायक विठठल कुंभार (वय 19, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे वडील राहतात. मुलगी घराबाहेर येता-जाता आरोपी तिचा पाठलाग करून त्याच्यावर प्रेम करण्यास भाग पाडत असे. पीडित मुलगी रात्रीच्या वेळी सार्वजनिक शौचालयात जात असताना आरोपीने तिला जबरदस्तीने त्याच्या घरात नेले. तिथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.

मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तरुणाने वारंवार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यामध्ये मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.