Talegaon Crime News : बुलेट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता विवाहितेला उपाशी ठेवले

एमपीसी न्यूज – पतीसाठी बुलेट घेण्याकरिता माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार फेब्रुवारी ते 19 ऑक्टोबर 2020 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

पती आकाश तुकाराम साबळे, सासू शेवंता तुकाराम साबळे, सासरे तुकाराम भागाजी साबळे (सर्व रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने मंगळवारी (दि. 20) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आकाश याला बुलेट घेण्यासाठी पती, सासू आणि सासरे या तिघांनी मिळून विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली.

तसेच नणंद फिर्यादीच्या अंगावर धावून आली. फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच उपाशी ठेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III