Talegaon crime News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

रविवारी दुपारी तीन वाजता रोहिणी यांनी तळेगाव येथील राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. माहेरहून संसारिक साहित्य आणण्यासाठी विवाहितेचा केला होता छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून संसारिक साहित्य, वस्तू आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी तीन वाजता तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

रोहिणी श्रीपाद तेलगावकर (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचे वडील श्रीमंत माधवराव धुमाळ (वय 55, रा. महादेवनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी नंदिनी व्यंकटराव तेलगावकर (गायकवाड), व्यंकटराव तेलगावकर, श्रीपाद व्यंकटराव तेलगावकर (सर्व रा. एक नंबर चौक, लातूर एमआयडीसी शेजारी, लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2019 मध्ये रोहिणी आणि आरोपी श्रीपाद यांचा विवाह झाला होता.

विवाहानंतर चार महिन्यांनी आरोपींनी आपसात संगनमत करून विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून टीव्ही, फ्रीज व इतर संसारिक साहित्य आणून देण्याची मागणी आरोपींनी केली.

तसेच वारंवार पैसे  आणण्याची मागणी करून रोहिणी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. रविवारी दुपारी तीन वाजता रोहिणी यांनी तळेगाव येथील राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.