Talegaon Crime News : ट्रक चालकाने पळवला 28 लाख 63 हजारांचा माल

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील एका कंपनीतून नागपूर येथील एका कंपनीत पोहोच करण्यासाठी ट्रकमध्ये दिलेल्या 28 लाख 63 हजार 810 रुपयांच्या मालाचा ट्रकचालकाने अपहार केला. हा प्रकार 27 मे रोजी रात्री साडेआठ ते 5 जून दरम्यान श्रीनिवास कंपनी नवलाख उंब्रे येथे घडला.

राजेंद्र कुमार हनुमान शर्मा (वय 62, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद भगवान गुरनुले (रा. नवी टाकळी, जि. भंडारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी चालक असलेल्या ट्रकमध्ये 28 लाख 63 हजार 810 रुपये किमतीचा माल नवलाख उंब्रे येथील श्रीनिवास कंपनीतून लोड करून दिला. नागपूर येथे महिंद्रा कंपनीत तो माल पोहोच करायचा होता. मात्र आरोपी ट्रक चालक गुरनुले याने तो माल नागपूर येथे पोहोच न करता त्या मालाचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.