Talegaon Crime News: बंद फार्म हाऊसमधून टीव्ही, होम थिएटर चोरीला

एमपीसी न्यूज – बंद फार्म हाउस मधून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही आणि होम थिएटर चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी बारा वाजता मावळ तालुक्यातील कुसगाव येथे वडनेरे फार्म हाउस येथे उघडकीस आली.

कौस्तुभ नंदकुमार वडनेरे (वय 43, रा. महात्मा सोसायटी, कोथरूड) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मावळ तालुक्यातील कुसगाव येथे वडनेरे फार्म हाउस आहे. त्यांचे फार्म हाउस शुक्रवारी रात्री नऊ ते रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कुलूप लाऊन बंद होते. दरम्यानच्या कालवधीत अज्ञात चोरट्याने फार्म हाउस मध्ये प्रवेश करून हर्म हाउसच्या हॉलमध्ये ठेवलेला 45 हजाराचा टीव्ही आणि 25 हजारांचे होम थिएटर चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.