Talegaon Crime News : देणगी देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून दीड लाखांचे दागिने पळवले (Video)

एमपीसी न्यूज – मंदिरासाठी देणगी देण्याच्या बहाण्याने एका वृद्ध व्यक्तीला मंदिरात बोलावून त्यांच्याकडील दीड लाखाचे सोन्याचे दागिने घेऊन कागदाच्या पुडीत बांधून दिले. मात्र हातचलाखी करून ते दागिने परत न करता स्वतःकडे ठेऊन वृद्धाची फसवणूक केली. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान नामदेव भेगडे (वय 75, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी दहा वाजता गणपती चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती चौकातील गणपती मंदिराच्या समोर फिर्यादी भेगडे बसले होते. त्यावेळी तिथे दोघेजण आले. त्यांनी भेगडे यांना सांगितले की, आम्हाला मंदिरासाठी देणगी द्यायची आहे. तुम्ही आत चला’.

भेगडे मंदिरात आल्यानंतर चोरटयांनी त्यांच्याकडील पाच हजार रुपये काढले. त्या पैशांना भेगडे यांच्याकडील सोने लावण्यास सांगितले. भेगडे यांनी दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आरोपींच्या पैशांना लावले. त्यानंतर आरोपींनी देणगी देण्याचे पैसे आणि भेगडे यांचे सोन्याचे गंठण एका पुडीत बांधून देण्याचा बहाणा केला आणि हातचलाखी करून गंठण काढून घेतले. रिकामी पुडी भेगडे यांच्या हातावर ठेऊन चोरटे फसवणूक करून निघून गेले.

 

हा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. शहरात हा व्हिडीओ व्हायरल होत असून तळगाव दाभाडे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.