Talegaon crime News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 9) पहाटे सव्वाबारा वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे येथे घडली. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

बाळू शंकर भानुसघरे (वय 38, रा. शिलाटने, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सव्वाबारा वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाने अंदाचे 30 वर्ष वय असलेल्या तरुणाला जोरात धडक दिली.

यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही.

अज्ञात वाहन चालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता तसेच पोलिसांना माहिती न देता पळून गेला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.