Talegaon Crime News : पिस्टल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; एक पिस्टल, दोन काडतुसे हस्तगत

एमपीसी न्यूज – पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. अटक केलेल्या तरुणाकडून एक पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई तळेगाव दाभाडेजवळ वराळे फाटा चौकात करण्यात आली.

शेखर रमेश काकरे (वय 29, रा. ओटास्किम, निगडी पुणे. मूळ रा. जांभूळगाव, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे व श्यामसुंदर गुट्टे यांना माहिती मिळाली की, वराळे फाटा चौकात वराळे गावाकडे जाणाऱ्या रोडवर एक तरुण थांबला आहे. त्याच्याकडे पिस्टल असून ते त्याने विक्रीसाठी आणले आहे. त्यानुसार पोलिसांनी वराळे फाटा चौकात सापळा लावला.

पोलिसांचा सुगावा लागताच संशयित तरुण पळून जाऊ लागला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण 53 हजारांचा ऐवज आढळून आला.

पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त केली. त्या पिस्टल बाबत त्याच्याकडे परवाना असल्याची चौकशी केली असता शेखर यांच्याकडे परवानगी मिळाली नाही. पोलिसांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शेखर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, श्यामसुंदर गुट्टे, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, संदिप ठाकरे, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे भरत माने, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.