Talegaon Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून जात असताना कार आडवी लाऊन कंटेनर थांबवला. त्यानंतर दोघांनी मिळून कंटेनर चालकाला लुटले.ही घटना रविवारी (दि. 25) पहाटे पावणे दोन वाजता उर्से टोल नाक्याजवळ घडली.

कमलेश हरिनाथ पटेल (वय 40, रा. गावासेहरा, भिवरा रामपूर, ता. मठीयाडू, जि. जोधपुर, उत्तर प्रदेश) यांनी याबाबत रविवारी (दि. 25) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पावणे दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी पटेल हे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून कंटेनर (पी बी 13 / ए एल 8996) घेऊन मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जात होते. उर्से टोल नाक्याजवळ आले असता एका कारने त्यांना ओव्हरटेक केले. कार कंटेनरच्या समोर थांबवून पटेल यांना थांबण्यास सांगितले.

कारमधील दोन चोरट्यांनी पटेल यांना ‘का रे तुला गाडी चालविता येत नाही का’ असे बोलून पटेल यांच्याकडील रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर पटेल यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करून चोरटे पळून गेले.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.