Talegaon Crime News – वेढणी घेण्याच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकाने दीड तोळ्याची सोन्याची वेढणी पळवली

एमपीसी न्यूज – वेढणी घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या एका ग्राहकाने दीड तोळे वजनाची सोन्याची वेढणी हातचलाखी करून चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास संघवी ज्वेलर्स, तळेगाव दाभाडे येथे घडली.

अशोक जवेरचंद्र ओसवाल (वय 57, रा. बुधवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 17) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे तळेगाव दाभाडे येथे जनता बँकेच्या शेजारी संघवी ज्वेलर्स नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती ग्राहक बनून त्यांच्या दुकानात आला. त्याने सोन्याची वेढणी खरेदी करण्याचा बहाणा केला.

वेढणीच्या डब्यातील नक्षीची वेढणी पाहतो, असे म्हणून डब्यातून 15 ग्रॅम वजनाची 65 हजार रुपये किमतीची सोन्याची वेढणी घेतली. ती वेढणी त्याने हातचलाखी करून चोरली आणि निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.