Talegaon : पाळीव श्वानाला चिरडणाऱ्या कार चालकावर गुन्हा

Crime on a car driver who bit a pet dog

एमपीसी न्यूज – कार चालकाने एका पाळीव श्वानाला कारखाली चिरडून मारले. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी लोढा बेलमेंडो सोसायटीच्या पार्किंगजवळ गहुंजे ( ता. मावळ) येथे घडली. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय आनंद नाईक (वय 58, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डी पटेल (रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गहुंजे येथील बेलमेंडो सोसायटीच्या टॉवर नंबर 17 च्या पार्किंग येथे फिर्यादी यांचा ‘पप्पी’ नावाचा पाळीव श्वान थांबला होता. त्यावेळी आरोपी कार (एमएच 14 / जीएच 6644) घेऊन आला.

या कारने पप्पी या श्वानाला धडक दिली आणि कार पप्पीच्या अंगावर घातली. यामध्ये पाळीव श्वान पप्पी रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.