Talegaon Crime : महिलेच्या घरात घुसून तोडफोड करत तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- महिला एकटी (Talegaon Crime) घरी असताना तिघेजण घरात आले. त्यांनी महिलेचा मुलगा कुठे आहे, त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत घरातील वस्तूंची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 18) सायंकाळी यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

अनिल सुभाष होतकर (वय 23, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशांत सुतार (वय 24), सागर जांभुळकर (वय 22, दोघे रा. जांभूळगाव, ता. मावळ) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : गुंतवणुकीचा परतावा न देता आठ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Talegaon Crime) यांची आई एकटी घरात असताना आरोपी घरात आले. अनिल कुठे आहे, आम्ही त्याला आज जिवंत सोडणार नाही, असे म्हणून आरोपींनी बांबूने घरातील टीव्ही, खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच शिवीगाळ करून आरोपी निघून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.