Talegaon crime News : डोक्याला पिस्तुल लाऊन महिलेचे गंठण पळवले

0

एमपीसी न्यूज – दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका चोरट्याने दुकानदार महिलेच्या डोक्याला पिस्तुल लाऊन 50 हजारांचे गंठण चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 15) दुपारी सव्वाचार वाजता शिरगाव येथे घडली.

सुनिता संभाजी अरगडे (वय 45, रा. अरगडेवस्ती, गहुंजे रोड, शिरगाव) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजता फिर्यादी अरगडे त्यांच्या दुकानात होत्या. त्यावेळी दोघेजण एका दुचाकीवरून आले.

त्यातील दुचाकी चालवणारा व्यक्ती हेल्मेट घालून दुकानात आला. दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती दुचाकीजवळ थांबला. हेल्मेट घातलेल्या व्यक्तीने दुकानात येऊन फिर्यादी यांना गुटखा मागितला.

दुकानात गुटखा नसल्याने सांगितल्यावर आरोपीने गायछाप आणि चुना पुडी मागितली. गायछाप आणि चुना पुडी काउंटर मधून काढून देत असताना हेल्मेट घातलेला आरोपी चोरटा दुकानात आला.

त्याने अरगडे यांच्या डोक्याला पिस्तुल लावले. पिस्तुलाच्या धाकाने त्याने अरगडे यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण काढून घेतले आणि चोरटे दुचाकीवरून पळून गेले.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.