Talegaon Crime : द्रुतगती मार्गावर बंद ट्रॅक्टरला टेम्पोची धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्या लेनमध्ये बंद पडलेल्या ट्रॅक्टरला टेम्पोची धडक बसली. यामध्ये टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 12) पहाटे चार वाजता घडला.

_MPC_DIR_MPU_II

मुरगेश शक्तीवेल (वय 25) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत मदन पळणीयेणी (वय 20, रा. तामिळनाडू) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालक बबन काळे (रा. आव्हाळवाडी, वाघोली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बबन याने त्याचा ट्रॅक्टर (एम एच 46 / बी बी 1895) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्या लेनमध्ये थांबवून ठेवला. ट्रॅक्टरचे इंडिकेटर, रिफ्लेक्टर न लावता अपघाताची परिस्थिती निर्माण केली. दरम्यान द्रुतगती मार्गावरून जात असलेल्या एका टेम्पोची (टी एन 48 / ए एच 0621) ट्रॅक्टरला धडक बसली. या धडकेत टेम्पो चालक मुरगेश याचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.