Talegaon CRPF Camp : सीआरपीएफ जवानाने गळफास घेऊन केली आत्महत्या

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे (Talegaon CRPF Camp) येथे सीआरपीएफ जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये घडली.

याबाबत अधिक माहिती देताना, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद शिपने म्हणाले, की ”अमरीश कुमार गिरी (वय 30 वर्षे) असे गळफास घेतलेल्या जवानाचे नाव आहे. तो मूळचा मिर्जापुर, उत्तर प्रदेश येथे राहणारा आहे. तो एक महिना सुट्टी घेऊन आपल्या गावी गेला होता व परवा तळेगाव दाभाडे येथे आला होता.

सकाळी तो कामावर रुजू होण्यासाठी कार्यालयात आला होता. कर्मचाऱ्यांना तो टेरेसवरील शोरूममध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. पोलिसांना तळेगाव दाभाडे (Talegaon CRPF Camp) पोलिसांना कळवले. त्यामुळे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. जवानाला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

Haveli : सतत येणाऱ्या अपयशाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

जवानाने आत्महत्यापूर्वी चिठ्ठी ठेवलेली सापडली का? याबाबत विचारले असता, शिपने म्हणाले, की पोलिसांनी त्याची अंग झडती घेतली व रूममध्येही शोधले पण कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. मृत जवान त्याच्या पत्नीसोबत तळेगाव दाभाडे शहरात राहत होता व त्याला दोन ते तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी शरद शिपने हे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.