Talegaon : खिडकीचे गज कापून सव्वापाच लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – खिडकीचे गज कापून घरातील कपाटातून कपाटातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 25 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मावळ तालुक्यातील परंदवडी येथे मंगळवारी (दि. 7) रात्री घडली.

राजू शिवराम पापळ (वय 50, रा. परंदवडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू मंगळवारी रात्री सहाच्या सुमारास घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला.

बेडरूममधील कपाटात ठेवलेले चार लाख रुपये रोख रक्कम आणि सुमारे 1 लाख 25 हजार रुपये किमतीचे 40 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.