Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लिलावती शाह यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व वैष्णव समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शिका लिलावती कांतीलाल शाह (वय 90) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, पतवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

लिलावती शाह यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीस त्यांनी कापड व्यवसाय केला. प्रामाणिकपणा आणि सचोटीच्या जोरावर त्यांनी या व्यवसायात चांगले नाव कमावले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कांतीलाला शाह आणि लिलावती शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश शाह आणि दीपक शाह यांनी ‘नम्रता ग्रुप’च्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन क्षेत्रात गरुडझेप घेतली. लिलावती शाह यांच्या प्रेरणेतून कांतीलाल शाह इंग्लिश स्कूलची निर्मिती झाली.गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सढळ हाताने मदत केल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालने खुली झाली.

उद्योजक शैलेश शाह व दीपक शाह यांच्या त्या मातोश्री तर युवा उद्योजक रवी शाह, राज शाह, जय शाह, नम्रता शाह यांच्या त्या आजी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.