Talegaon Dabahde : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला आय. एस. ओ. मानांकन

एमपीसी न्यूज- मावळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला 9001: 2015 आय एस ओ मानांकन प्राप्त झाले आहे. ओटयाबु संस्थेच्या वतीने योगेश खैरनार यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई सुधीर वहिले यांना प्रदान करण्यात आले.

पतसंस्थेच्या कार्यालयात शोभाताई वहिले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ, कर्मचारी आदींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सल्लागार बाबासाहेब औटी, वि म शिंदे गुरूजी, प्रसिद्धी प्रमुख सुहास विटे, बाळासाहेब शिंगाडे, संजय वाघ, केंद्र प्रमुख संघटनेचे राज्य अध्यक्ष रामराव जगदाळे, मावळ तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश गायकवाड, गेणु मोरमारे, डी सी पी एस संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सातपुते, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा थोपटे, सरचिटणीस निर्मला काळे, दत्तात्रय भालेराव, सुजाता तारळकर, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सावंत, किशोर तळेगावकर, पतसंस्थेचे संचालक संदीप कांबळे, अमोल चव्हाण, राजू लोंढे, प्रमोद भोईर, राहुल लंभाते, हरिभाऊ आडकर,
मुकुंद तनपुरे, ज्ञानेश्वर शिवणेकर, सुहास धस, जालिंदर कांबळे, संतोष पन्हाळे, संतोष भारती, कल्याणी रासकर, तृप्ती गाडीलकर, तज्ञ संचालक श्रीकांत दळवी, रमेश बनसोडे तसेच पतसंस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

आगामी काळात संस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्नशील राहणार असल्याचे शोभाताई वहिले यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब ओहोळ यांनी केले. संस्थेचे संचालक नारायण कांबळे व अनिल कळसकर यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे कार्यकारी संचालक सुमित नळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.