Talegaon Dabahde : सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे यांची 266 वी पुण्यतिथी साजरी

एमपीसी न्यूज- विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मावळ तालुक्याच्या वतीने सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांची 266 वी पुण्यतिथी विविध उपक्रमांद्वारे साजरी झाली.

तळेगाव दाभाडे येथील हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे सरकार यांच्या तळेगाव दाभाडे येथील समाधीस्थळी समाधीस्थळी स्वच्छता करून पूजन करण्यात आले. हार फुलांनी समाधी सजवण्यात आली. दीपोत्सव करण्यात आला. यावेळी दाभाडे राजघराण्यातील सर्व प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

शिवव्याख्याती अश्विनी तरस यांचे उमाबाईसाहेबांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान झाले. विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते व तळेगाव दाभाडे तील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशोक दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले सोमनाथ दाभाडे यांनी प्रस्तावना केली सदानंद पिलाने यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेश भेगडे, गोविंद आयनापार्थी, सुशील वाडेकर, कपिल देवाडिगा, सुभाष भुते, प्रणव दाभाडे, सागर कटके, सचिन धमाले, महेंद्र असवले, अमित भेगडे, योगेश खांड भोर, विश्वास दळवी, शुभम दरेकर यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.