Talegaon Dabhade: साळुंब्रे येथील ग्राम प्रबोधिनी ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा 100 टक्के निकाल

Talegaon Dabhade: 100 percent result of Gram Prabodhini Junior College, Salumbre पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृतीयुक्त व जीवनदायी शिक्षण ग्राम प्रबोधिनीत दिले जाते.

एमपीसी न्यूज- साळुंब्रे येथील ग्राम प्रबोधिनी ज्युनियर कॉलेजने यशाचा अजून एक टप्पा पार केला असून यावर्षी कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य राजेंद्र लासूरकर यांनी दिली.

पुस्तकी शिक्षणाबरोबरच कृतीयुक्त व जीवनदायी शिक्षण ग्राम प्रबोधिनीत दिले जाते. परिसरातील युवक व युवतींच्या मनामध्ये राष्ट्राभिमान निर्माण व्हावा ते आत्मनिर्भर व्हावेत यादृष्टीने व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारची व्यावसायिक कौशल्ये देखील विद्यार्थ्यांना शिकवली जातात.

त्याचबरोबर पुस्तकी शिक्षणालाही महत्व दिले जाते. नियमित शिक्षणातील गुणवत्ता यावर्षी देखील कायम ठेवल्याने ग्राम प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. गिरीश बापट तसेच ग्राम प्रबोधिनीचे कार्यवाह व्यंकटराव भताने यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. गणेश भताने, प्रा. अशोक गवळी, प्रा. शालन गोसावी, प्रा.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-

1. प्रियंका गायकवाड – 76.30 टक्के
2. दिव्या विधाटे- 59.07 टक्के
3. कोमल गायकवाड -56.76 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.