Talegaon Dabhade : ‘सामुहिक महिला अथर्वशीर्ष पठण’ कार्यक्रमात 1050 महिलांचा सहभाग

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि गणेश तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामुहिक महिला अथर्वशीर्ष पठण’ चा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ नगरसेवक संतोष मा.भेगडे यांच्या संकल्पनेतून स्व. कासाबाई भेगडे सभागृह येथे पार पडला.

या कार्क्रमाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी महिलांचा उत्साह आणि सहभाग वाढत आहे. यंदाच्या कार्यक्रमास एकूण १०५० महिलांनी सहभाग नोंदविला. उर्मिला भेगडे आणि शीतल पवार यांच्या हस्ते गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिलांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये तळेगाव दाभाडे मधील नगरसेविका मंगल भेगडे, वैशाली दाभाडे, माया भेगडे तसेच नूतन भेगडे, मेघा भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे, राहुल पारगे, सतीश भेगडे, डॉ शाळीग्राम भंडारी, शंकर मा. भेगडे, समीर अनिल पवार, मिथिल धोत्रे, गोरख काकडे, गणेश तरुण मंडळाचे उपाध्यक्ष प्रतीक माने, पदाधिकारी श्रीकांत मेंढी व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत मेंढी यांनी केले. सूत्रसंचालन सतीश भेगडे यांनी केले. पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वीकारिता परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.