Talegaon Dabhade: 108 जणांनी रक्तदान करून वाहिली विनोद मेहता यांना श्रद्धांजली

Talegaon Dabhade: 108 people donated blood to pay homage to late Vinod Mehta

0

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील दिवंगत सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक,सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक विनोदभाई मेहता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावातील लक्ष्मीनारायण मंदिरात भव्य शिबिरात 108 जणांनी रक्तदान केले.

बालाजी मंदिर ट्रस्ट,गणेश तरुण मंडळ आणि यशवंत व्यवसायी शाखा यांनी या शिबिराचे संयोजन केले. गुरुवारी (२१ मे) सकाळी दहापासून या शिबिराला सुरुवात झाली. गरवारे रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले.

शिबिराच्या ठिकाणी कोरोना साथीच्या संदर्भात आवश्यक ते सर्व नियम पाळले गेले. शिबिरात  रक्तदाता हात निर्जंतुक करून, शरीराचे तापमान बघून मगच प्रवेश करीत होता. तळमजल्यावर नोंदणी केली जात होती. आवश्यक ती तपासणी करून रक्तदाता पहिल्या मजल्यावर रक्तदान करण्यासाठी जात होता.

दिवंगत विनोदभाई मेहता यांच्याविषयीच्या जिव्हाळ्याने मोठ्या संख्येने तरुण, महिला शिबिरात सहभागी झाले होते. रांग लावून रक्तदान करण्याचे दुर्मीळ दृश्य येथे पाहावयास मिळाले. नियोजित वेळेत एकशे आठ जणांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. रक्तदान करून सर्वांनी विनोदभाईंना श्रद्धांजली अर्पण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like