Talegaon Dabhade : स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन परिसरातील स्वामी समर्थ नगर येथील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो वजनी शुद्ध तांब्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सुप्रिया शेखर शिंदे यांनी ही मूर्ती (Talegaon Dabhade) बनवली आहे. वळामे आणि काकडे परिवाराच्या वतीने ही मूर्ती बनवण्यात आली आहे. प्रतिष्ठापना समारंभ रविवारी (दि.21) संपन्न झाला.

 

वळामे आणि काकडे परिवाराच्यावतीने आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या शुद्ध तांब्याच्या 1131 किलो वजनी मूर्तीची प्रतिष्ठापना तळेगाव दाभाडे परिसरातील स्टेशन भागातील स्वामी समर्थ नगर येथील स्वामी मंदिरात रविवार (दि. 21)रोजी करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात तांब्याच्या मूर्तीचे एकसंघ कास्टिंग करणाऱ्या दुसऱ्या वर्ल्ड ऑफ रेकॉर्डच्या मानकरी सौ.सुप्रिया शेखर शिंदे यांना मानांकन प्रदान करण्यात आले.

               

याप्रसंगी वळामे एंटरप्राइजेसचे संचालक प्रकाश वळामे,कपिल वळामे,श्री सिद्धिविनायक कंस्ट्रक्शनचे संचालक गणेश काकडे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे सीईओ पंकज सोळंकी,सरदार सत्यशीलराजे दाभाडे सरकार,शेखर शिंदे,आशिष खांडगे यांच्या हस्ते शिल्पकार सौ. सुप्रिया शिंदे (Talegaon Dabhade) यांना मानांकन प्रदान करण्यात आले. स्वामी समर्थ परिवारातर्फे उपस्थित्यांचे स्वागत व प्रास्ताविक गणेश काकडे यांनी केले.

14 एप्रिल 2002 मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली असून तब्बल 12 वर्षानंतर संगमरवर मधील मूळची मूर्ती हटवून आता त्या जागी नव्याने अस्सल तांब्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असल्याची सविस्तर माहिती काकडे यांनी दिली.शिल्पकार सौ.सुप्रिया शिंदे यांचे अभिनंदन करत मागील 22 वर्षात स्वामी समर्थ परिवाराच्या वतीने सेवा कार्यात हजारोंच्या संख्येने लोक जोडले जात असून ही संख्या वाढती असल्याने भाविकांसाठी भविष्यात भव्य नियोजन करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.

 

 

स्वामी समर्थ मंदिराच्या स्थापनेपासून नित्यसेवा बजावणाऱ्या वनिता निशिकांत वळामे (Talegaon Dabhade) यांनी मनोगत व्यक्त केले. सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांनी उपक्रमाला शुभेच्छा देताना सरदार घराण्याच्या माध्यमातून स्वामी समर्थांची होत असलेल्या सेवाकार्याची माहिती देत धार्मिक सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.योगिता कपिल वळामे यांनी आभार मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.