Talegaon Dabhade: जनसेवा विकास समितीच्यावतीने 24 तास मोफत ॲम्ब्युलन्स सेवा

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या सौजन्याने तळेगाव परिसरासाठी मोफत ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तिचे अनावरण मराठा क्रांती चौक येथे करण्यात आले.

एमपीसी न्यूज- जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या सौजन्याने तळेगाव परिसरासाठी मोफत ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तिचे अनावरण मराठा क्रांती चौक येथे करण्यात आले.

जनरल हॉस्पिटलच्या गेट जवळ एक मृतदेह ॲम्ब्युलन्सविना चार तास पडून होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी किशोर आवारे यांना संपर्क साधला. किशोर आवारे यांनी तत्परता दाखवत त्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी उचलली. 24 तासांच्या आत समस्त तळेगावकरांसाठी मोफत ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली व तिचे अनावरण करण्यात आले.

या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरुडे, दिलीप डोळस, सुनील वाळुंज, उद्योजक कल्पेश भगत, सुनील पवार, राहुल जाधव, अनिल पवार, संजय चव्हाण, गौरव खांडगे आदी उपस्थित होते. ही रुग्णवाहिका हवी असल्यास विठ्ठल (मो. नं. 8208870169) यांच्याशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.