Talegaon Dabhade: बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 25 वर्षीय युवकाला एक वर्षाचा कारावास

एमपीसी न्यूज – बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 25 वर्षीय युवकाला शिवाजीनगर न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

स्वप्निल विश्वास शिंदे (वय 25, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ. मूळ रा. कोंढवे धावडे, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बाललैंगिक अत्याचार (पोस्को) गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपीला शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर केले. न्यायाधीश डी जी मुरूमकर यांनी आरोपीला भारतीय दंड संहिता कलम 354 अन्वये एक वर्ष सक्त मजुरी आज 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधी कैद. तसेच पॉस्को कायदा कलम 11, 12 अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद. अशी आरोपीला एकूण एक वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.